मी तुषार नवले (दिंडोरी). मला १० एकर
जमीन आहे. पण त्यातील काही जमीन खडकाळ आहे. काही खाली वर आहे. एक सारखी
जमीन माझ्याकडे नाहीच. मी आई वडिलांचा एकुलता एक. माझे वडील सैन्यदलात होते. काही
कारणास्तव ते ती नोकरी सोडून शेती करायला लागले होते. तेव्हा मी लहान होतो. शाळेत
जायचो. आम्हाला पाणी भरपूर होते. करंजवन धरणाजवळ आमची जमीन असल्यामुळे पाण्याची
काहीच चिंता नव्हती. मी लहान असतांना माझे वडील भाजीपाल्याची शेती करायचे. आमचे
एकत्र कुटुंब होते. माझ्या वडिलांना तीन भाऊ होते. त्यातील माझे दोन नंबरचे काका
भाजीपाला घेऊन नाशिक मार्केटला यायचे. त्यातून आम्हाला चांगले उत्पन्न मिळत होते.
त्या भाजी पाल्याच्या व्यवसायातून आर्थिक आमची
प्रगती चांगलीच सुधारत होती. त्याकाळी (२० वर्षांपूर्वी) आम्ही टेम्पो
घेतला होता.
घरातले सर्व मिळून मिसळून राहत होते. एकमेकांचे विचार जुळत होते. आम्ही टेम्पो घेतल्यामुळे आजूबाजूचे शेतकरी देखील भाजीपाल्याचा शेती व्यवसाय करू लागले होते. आम्हाला उत्पन्न चांगले मिळत होते. त्यातून आम्ही काही जमीन सुद्धा विकत घेतली होती. माझे शिक्षण देखील चालू होते. आता मी एम.एस.सी., बी. एड. झालो होतो. शेतीतही चांगली आवड होतीच. मला कॉलेजमध्ये नौकरी लागत होती. पण नौकरीसाठी एका संस्थेकडून १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे मी निराश न होता चांगले झाले असेच वाटत होते. पण माझे वडील निराश झाले होते एवढे शिकून मला नौकरी नाही म्हणून नेहमी चिंतीत असायचे. पण मला नौकरी म्हणजे दुसऱ्याची गुलामी करणे असे वाटत होते. मी असे ठरवले होते कि नौकरीसाठी १० लाख भरण्यापेक्षा आपल्या शेतातच एवढ्या पैशांची गुंतवणूक केली तर त्याचे फळ आपण नक्कीच घेऊ शकतो.
घरातले सर्व मिळून मिसळून राहत होते. एकमेकांचे विचार जुळत होते. आम्ही टेम्पो घेतल्यामुळे आजूबाजूचे शेतकरी देखील भाजीपाल्याचा शेती व्यवसाय करू लागले होते. आम्हाला उत्पन्न चांगले मिळत होते. त्यातून आम्ही काही जमीन सुद्धा विकत घेतली होती. माझे शिक्षण देखील चालू होते. आता मी एम.एस.सी., बी. एड. झालो होतो. शेतीतही चांगली आवड होतीच. मला कॉलेजमध्ये नौकरी लागत होती. पण नौकरीसाठी एका संस्थेकडून १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे मी निराश न होता चांगले झाले असेच वाटत होते. पण माझे वडील निराश झाले होते एवढे शिकून मला नौकरी नाही म्हणून नेहमी चिंतीत असायचे. पण मला नौकरी म्हणजे दुसऱ्याची गुलामी करणे असे वाटत होते. मी असे ठरवले होते कि नौकरीसाठी १० लाख भरण्यापेक्षा आपल्या शेतातच एवढ्या पैशांची गुंतवणूक केली तर त्याचे फळ आपण नक्कीच घेऊ शकतो.
वडिलांशी मी याबात बोललो. मला
नौकरीत रस नाही असे स्पष्ट पणे सांगितले.
मला शेती करायची अआहे व जे पैसे तुम्ही माझ्यासाठी भरणार आहे ते मला भांडवल म्हणून
द्या अशी मागणी केली. पण वडील काही तयार झाले नाही.
आमच्यातला वैचारिक दुरावा वाढत चालला होता. मी घरचीच शेती करण्याचे ठरवले
होते. त्यासाठी मी जमिनीवर द्राक्ष बागेची आखणी केली. जमीन खालीवर असल्यामुळे खूप
त्रास झाला होता. मी वडिलांना न विचारता हा निर्णय घेतला होता. खर्च भरपूर येणार
होता. वडिलांनीही काही कालांतराने संमत्ती दर्शवली आणि द्राक्ष बागेची लागण केली.
प्रथमता ३ एकर क्षेत्रावर द्राक्ष लागवड केली. त्यासाठी भरपूर कष्ट मी घेतले.
वडिलांचे लक्ष माझ्याकडे माझ्याकडे नव्हतेच. ते फक्त मला भांडवल पुरवत होते. मी
द्राक्ष बाग सांभाळली. मला त्याचे चांगले फळ मिळाले. वडील माझी मेहनत बघून खुष
होते. पाहिल्याच वर्षी माझा झालेला खर्च फिटला होता. माझ्या मेहनती बरोबरच
शिक्षणाचा मला भरपूर उपयोग होत होता. खुठ्ल्या वातावरणात खुठले औषध वापरायचे याचे संपूर्ण ज्ञान मी
मिळवले होते. दुसर्याच वर्षी मी निर्यातक्षम
द्राक्ष बनवायचे ठरवले होते. त्यासाठी खूप काळजी घ्यावा लागते हे मला माहित
होते. मी तसेच करू लागलो औषधांची फवारणी काळजीने घेऊ लागलो होतो. त्यामुळे निर्यात
क्षम द्राक्ष बनवण्यासाठी मी यशस्वी झालो होतो. माझे यश बघून आता वडीलही मला काही
बोलत नव्हते. नौकरीचा विषयही परत त्यांनी काढला नव्हता.
पण मला शेतीच्या जोडीला काहीतरी
जोडधंदा असायला हवा असे वाटू लागले होते. जसजसे मला शेतीतून मिळालेले फळ वाढत होते
तश्याच माझ्या अपेक्षाही वाढत होत्या. मी
शेतीच्या जोडीला जोडधंदा म्हणून बंदिस्त शेळी
पालन करण्याचा व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यासाठी वडिलांची परवानगी घ्यायची
होती. वडिलांची परवानगी काढणे हा माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न होता. मोठा धीर धरून
मी वडिलांशी या विषयी बोललो. सर्व बोलणे झाले माझे आणि वडिलांनी बंदिस्त शेळी पालन करण्यास नकार दिला. पण मला काही स्वत
बसवेना. मी बंदिस्त शेली पालन कसे करायचे व त्यासाठी किती खर्च येतो याची संपूर्ण
माहिती काढली. अनेक वेळेला पुण्याला व इतर
ठिकाणी शिबिराला जाऊन तज्ञांकडून मार्गदर्शनही घेतले. व्यवसाय मला चांगला वाटत होता. पण घरच्या सर्वांचा याला विरोध
होता.
मी मनातून पूर्णपणे तयारी केली होती.
या विषयी मी माझ्या मित्राला संपूर्ण माहिती दिली व घरच्यांचा कसा विरोध आहे ते
देखील सांगितले. त्यालाही याविषयी उत्सुकता वाटू लागली होती. तो मला बोलाला की, आपण दोघे मिळून हा व्यवसाय
करू. पण त्यासाठी त्याच्याही घराचे नाही म्हटले होते आमच्या पदरी निराशा होती. पण
आम्ही यातून मार्ग काढत होतो. शेवटी एक मार्ग आम्हाला भेटलाच. आमच्या शेतात काम
करणारा शेतमजूर होता त्याची जमीन एका शेतकर्याकडे गहन होती ती आम्ही सोडवून
घेण्याचे ठरवले. त्याबाबत त्या माजुराशी बोललो. ती शेतजमीन त्याने वीस हजार
रुपयांना गहान ठेवली होती. आम्ही ती सोडवून घेतली व त्या शेतमजुराला आणखी २० हजार
रुपये देवून त्याच्या कडून पाच वर्षांचा करार करून घेतला होता. त्याची जमीन व माझी
जमीन या दोघांमध्ये फक्त नदी आडवी होती. घरून पैसे मिळणार नव्हते. आम्ही पहिल्या
वर्षी त्या जमिनीत झेंडूची लागवड केली. त्यातून जेवढे पैसे आम्हाला झाले ते सर्व
आम्ही जमिनीचे सपाटीकरण करणे, विविध सोयी करणे यात घालवले. बंदिस्त शेळी पालन करण्यासाठी
शेड हवे होते त्यासाठीही खर्च येणार होता. घरून तर एक रुपयाही मिळत नव्हता.
दुसऱ्यावर्षी मका लावली. त्यातून भरघोस उत्पन्न मिळाले. शेड होईल एवढे पैसे आता
आमच्या कडे जमले होते. पण शेळ्या आणण्यासाठी पैसे लागणार होते त्यासाठी आम्ही कर्ज
काढून सुरुवातीला अगदी छोटा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. त्यासाठी आम्ही
उस्मानाबादी या जातीच्या शेळ्यांची निवड केली व बोअर या जातीच्या बोकडांची
पैदासासाठी निवड केली. सुरुवातीला मी २० शेळ्या व तीनच बोकड घेतले. एका बोकडाची
किंमत ४० ते ५० हजार होती. हळूहळू मला यातून चांगला नफा मिळू लागला. यातुन मी हा
व्यवसाय वाढवण्याचे ठरवले होते. मी शेतातला एक रुपयाही यात न टाकता आलेल्या
नफ्यातून मी हा व्यवसाय वाढवत गेलो. आता माझ्या कडे १०० शेळ्या आहे व त्याच बरोबर
२० बोकड आहे. ईद व कारण्याच्या वेळी
बोकडांना चांगली मागणी असते मी एक बोकड ६० हजार रुपयांपर्यंत विकला आहे.


हे सर्व मी घरच्यांना न सांगता केले होते. आता मी वडिलांना माझ्या बंदिस्त
शेळी पालनाच्या शेड बद्दल संपूर्ण माहिती दिली होती. आलेले पैसे त्यांना मी दिले
होते. त्यांना माझे यश पाहून खूप बरे वाटले होते. आता पूर्णपणे मी शेतकरी आणि
व्यावसायिक झालो होतो. आता माझे लग्न जमले आहे. शेतकऱ्याचीच मुलगी आहे. वडील
अभिमानाने भेटेल त्याला माझी यशोगाथा सांगतात. हे सर्व माझ्या स्वतातील
स्वभावामुळे झाले होते. स्वतातील गुण ओळखून यश संपादित करता येते, हे मी माझ्या वडिलांसह
साऱ्या गावाला दाखवून दिले आहे.
your great
ReplyDeletesir kharch tumachi yashogatha vachaun majha atmvishvas vadhala mi suddha ek shetkaryacha mulaga aahe majhe hi Education B.SC.B.ED jhalel aahe mala hi tumachya sarkhech goat farm karnyachi echya aahe plz mala margdarshan milel.sir tumacha contact no dya
ReplyDeleteSir mala pan Sheli palan karaych ahe krupaya aple margadarshan karate. Mala aple goat farm bagnyachi Ani margadarshanachi ichha ahe tari apan apla contact no. Ani address milava hi Vinanti..plz
ReplyDeleteशब्बास भौ ...
ReplyDeleteतुमच्या या कथेवर माझा विश्वास नाही, मी हि शेळीपालन केले , शेळ्यांची संख्या हि वाढली धष्टपुष्ट बोकड असूनही 5000 रु पेक्षा जास्त रुपयाला जात नाहीत मग यात फार थोडा नफा उरतो कि ज्यातून कुटुंबाचा 10टक्के खर्च हि भागत नाही
ReplyDelete