आमचा तालुका दुष्काळी आहे. गावातील तरुण
मुले कामासाठी शहरात जातात किंवा गावातच कोंबड्यांच्या खाद्याची कंपनी आहे तेथे
जातात.
तेथे क काही काम मिळते. जो शिकलेला आहे
त्याला सावलीत बसून काम हव असतं. मी पदवीधर झालो आहे. शिकतांना मिळालेली कामे मी केली. परंतु मी आता
चांगल्या कामाच्या प्रतीक्षेत आहे. जाहिराती पाहून मी अर्ज करतो. मी आई – वडिलांना सांगितले आहे की, मला चांगली नोकरी मिळणार आहे. त्यांनाही आशा आहे. गावात
मोठेमोठे शेतकरी आहेत. आमचा भाग दुष्काळी असल्याने एक वर्षी चांगला पाऊस झाला की
तीन –
चार वर्षे त्यांना घोर नसतो. गावची शेती
चांगली आहे. आमच्या भागातील कांदा जास्त प्रसिद्ध आहे. याचे कारण हा जमिनीचा
गुणधर्म आहे. आमच्या
गावच्या एका शेतकऱ्याने शेततळे खोदून पावसाचे पाणी साठवून ठेवले. त्यातून ते एकरी
१५० ते १७० क्विंटल कांद्याचे उत्पादन काढतात. त्याचं बघून इतरही शेतकरी त्यांच्या
पावलावर पाऊल ठेवीत आहेत. एखाद्यानं चांगलं काम केलं, त्याचं अनुकरण जर इतर करीत असतील तर
चांगलंच आहे. असं अलीकडे गावात घडत आहे. अस घडत असले तरी निसर्गाची साथ हवी. ती
मिळेल याची मात्र खात्री नाही.
पाच एकर शेती आहे. आम्ही शेततळे
खोदले नाही. लहान शेतकऱ्यांच धाडस होत नाही. जे काही निसर्गदयेने पोटापुरत मिळेल
त्यावरच आम्ही समाधान मानत आलो आहोत. आमच्या गरजाही मर्यादित झालेल्या आहे. परंतु
शेतकरी कुटुंबात मी वाढल्यामुळे वाण नाही पण थोडा तरी गुण येणारच. आमची
नोकरीची
आशा असलेले माझे डोळे अलीकडेच शेतात शेततळे खोदतायेईल् का,
याचा अंदाज घेत आहे. गावात आमच्या
इतक्या लहान शेतकऱ्यांनी असं धाडस केलेलं नाही. मला अशी माहिती मिळाली
की, शेततळ्याकरिता
सरकारही काही मदत देते. मी
ग्रामसेवकांकडून माहिती घेतली. एका योजनेतून एक लाख रुपये मदतही मिळेल असं ते मला बोलले. मी धाडस करून शेततळे
खोदण्याचा विचार केला.
ग्रामसेवकाकडे जाऊन अर्जही भरून घेतला.
शेतातले खोदण्यासाठी सरकारी मदत मिळाली.
निसर्गाला दया आली, पाऊस भरपूर झाला. तळ भरून गेलं. माझी पाच एकर जमीन पाण्याखाली आली.
आता कांद्याच चांगले पीक आहे. दोन वर्षे
शेती पडित होती. ती फक्त
पाण्याअभावी. आता दोन – अडीच लाख रुपये खात्यावर जमा आहे. पुढे मी एक एकर शेतावर द्राक्ष बाग लावण्याचा विचार केला आहे. गावातील मोठ्या
शेतकऱ्यांकडून मी द्राक्ष
बागेची माहिती देखील घेतली आहे. नोकरीचा
विसर जणू मला पडला आहे. एक एकर क्षेत्रावर
मी उन्हाळी कांद्याच पीक घेतलं आहे. दोन
सव्वादोन लाखांचं उत्त्पन्न मला अपेक्षीत
आहे. लाल कांद्यांचे मला तीन लाख रुपये झाले.
गावच्या मोठया शेतकऱ्यांच्या पंक्तीत
मी जाऊन बसलो आहे. गावात थोडा मोठेपणाही
मिळायला लागला आहे. माझ्यासाठी चांगले
दिवस आले आहे. यापुढेही चांगले दिवस
येतील याची थोडी चाहूल लागली आहे.