Wednesday, 25 March 2015

कष्टाची खरी किंमत आता मला कळली होती


दोघा ‌भावांची वाटणी झाली. मलाच वाटणी हवी होती. मोठा भाऊ काही काम न करता केवळ पैसा खर्च करत होता. मी कष्ट करून पैसा तयार करणार आणि हा तो उधळणार ! मी कधीही व्यवहार बघितलेला नाही. मी त्याला कधी हिशोब विचारत नव्हतो. आमच्या बरोबरीच्या लोकांनी चांगली घरे बांधली होती. काही लोकांनी जमिनीही विकत घेतल्या होत्या. आम्हालाही पुढे जाण्याची ओढ लागाली होती. सगळ्यांपेक्षा गावात आमची पिके चांगली असतात. एकरी १०० टनांपेक्षा कमी कधीच उस पिकला नाही.  यामागे माझी मेहनत कारणीभूत होती. यात मोठ्या भावाचे काहीच योगदान नव्हते. वडिलभाऊ म्हणून त्याच्या नावावर शेती आहे. सगळीकडे तो प्रगतीशील म्हणून मिरवतो. त्याने कधीच नांगर धरला नाही की आजपर्यंत एक सरीही भांगालाली नाही. त्याला शेतीतील काहीच कळत नाही. पण त्याला पुस्तकी न्यान आहे. शेतीविषयक बरीच पुस्तके तो घेऊन येतो, त्यातून तो न्यान मिळवत असतो. हे सगळ तो मिरवण्यासाठी करत असतो. यातून त्याला खोटा सन्मान मिळत असतो. अशा खोट्या गोष्टीची त्याला नशा  चढली होती. हे मला पटत नव्हत. अशी नशा दारूच्या नशेपेक्षाही वाईट असते. असेच मला वाटत होते.

       मी पूर्वीच त्याच्यातून वेगळा निघणार होतो, पण माझी बायको मला विरोध करत होती. ती  मला सारख म्हणायची तुम्हाला व्यवहार कळत नाही. सकाळ झाली कि रानात जाता. दिवसभर रानातच असता.रानाखेरीच तुम्हाला कश्याचाच नाद नाही. तुमची चार लोकांत ऊठबस नाही. पण तिला हे कळत नव्हत की  मी रानांत जातो व रानातल मला सगळं कळत  म्हणूनच पिके चांगली येतात. ज्यांना रानातले काही येत नाही ते रान विकायला निघाले आहेत. आम्ही पिकला जेवढ पाहिजे तेवढच पाणी वापरतो.त्यामुळे आमची पीके चांगली असतात. शेतीतच मी चांगली कमाई करू शकतो हे मला कळले होते, तरी पण माझ्या बायकोला मी अडाणी वाटत होतो. माझा भाऊ बोलण्यात चलाख आहे, त्यामुळे कुणावरही छाप टाकतो. मी सतत मातीतच काम करतो त्यामुळे अंगावर नेहमी मळकट कपडे असतात.भाऊ पारित घडीची कपडे वापरतो. त्याला काही कमवाव लागत नाही. त्याला केवळ खर्च करायचा असतो. बाहेरची लोक कपड्यांवारुंच माणसाची पारख करतात. पण गावात कुणाची काय ऐपत आहे, हे मला ठाऊक आहे. आमची पिकं चांगली आसल्यामुळे भाऊ ताठ मानेने चालतो. ज्याच्या रानात चांगली पिके नाही त्याचा तो अपमान करतो . हे मला आवडत नाही.

      वेगळ निघतांना भावाने कर्ज दाखवले होते. तरी मी सहन केले. आजपर्यंत जे झाले ते मी सोडून देणार आहे. मला जगायची भीती वाटत नाही. आता पर्यंत भावाचा रुबाब आमच्याच कष्टावर होता. रानात पिक काढण बोलण्या इतपत सोप नाही. घाम गाळावा लागतो,त्याला देखील हे ठाऊक होते. बायकोचेही डोळे आता उघडले आहेत. मी तिला बोललो कि हे कर्ज फेडणे काही अवघड नाही. मी तिला आधार देत होतो. दिवसामागून दिवस चालले होते. आता खर्या अर्थाने आम्ही संसाराला लागलो होतो. शेती करण्याचा अनुभव माझ्याकडे होताच. नवीन काही करण्याच्या मी प्रयत्नात होतो. पण मला मार्ग सापडत नव्हता. माझ्या वाट्याला भरपूर जमीन आली होती. उत्पन्न बऱ्यापैकी होते. त्यामुळे वेगळे पिक घेण्यात रस निर्माण होत नव्हता. माझ्या बायकोच्या  भावाने उसाची नवीन जात लावली होती.
ती  जास्त उत्पन्न देणारी व रसवंती साठी चालणारी जात होती. त्या उसाला  स्थानिक बाजार पेठेत चांगली मागणी होती. मी पण ती ऊसाची जात लावण्याचे ठरवले. बियाणे खरेदी करून लगेच लागण केली. मी काटेकोर पाने पाण्याचा वापर करत होतो. बायकोच्या भावाचे मार्गदर्शन घेत होतो. तसा मलाही भरपूर अनुभव होताच. मी उसाला ठिबक सिंचन केले होते. त्यामुळे मला सेंद्रिय खते देणे व औषधे देणे सोपे झाले. पाण्याची बचतही होत होती. मला उत्पन्न भरपूर होणार होते. कर्ज पहिल्याच वर्षी फिटले होते. मला एकरी उसाचे १२५ क्विंटल उत्पादन मिळाले याला कारण माझी मेहनत होती. यापुढेही माझा दुसरा प्लॉट चालू होणार होता. त्यातुं मला चांगले उत्पन्न मिळाले. याचे कारण म्हणजे मी करत असलेली मेहनत व माझ्या बायकोची मला मिळालेली साथ. कष्टातूनच माणूस पुढे जातो हे मला कळले होते. कष्ट करत राहिल्यास अनुभव आपोआप येत असतो. कष्टाची खरी किंमत आता मला कळली होती.         

No comments:

Post a Comment