Wednesday, 25 March 2015

कष्टाचे फळ

मी दशरथ वाघ चांदवड तालुक्यातील परसूल या गावाचा शेतकरी.
 मला जमीन चांगलीं आहे मला दोन मुले आहेत. एक मुलगी आहे मुलीच लग्न झाले आहे. मोठ्या मुलाच लग्न झाले आहे. आमचा तालुका दुष्काळी आहे. त्यामुळे आमची शेती फक्त हंगामीच. उन्हाळ्याचे चार महिने पूर्ण आराम असतो कारण प्यायला देखील पाणी राहत नाही उन्हाळ्यात. यातून काहीतरी मार्ग काढावा असे मला वाटत होते. माझ्या बरोबरच माझे मुले देखील मी शेतीवर ठेऊन घेतले होते. कारण एकट्याला शेती करणे मला जड जात होते. एवढी शेती एकट्याने करणे मला डोईजड होत होते. शिकूनही नोकरी  कुठे भेटते अन शेतकऱ्यांची पोरांनी आपला पेशा जपला पाहिजे असे माझे वैयक्तिक विचार  होते. त्यामुळे मी पोरांना फक्त गरजे पुरते शिकवले होते.
     आम्ही सर्वच उन्हाळ्यात घरी बसून राहायचो. तसे तर संपूर्ण गावाला उन्हाळ्यात काम राहत नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यातून माझी मुले व मी मार्ग काढत होतो. काहीतरी धंदा करण्याच्या विचारात आम्ही होतो. पण धंदा करायचा म्हटला तर आपल्याला अनुभव नाही आणि त्याला आधी भरपूर पैसा गुंतवावा लागतो असेही वाटायचे. म्हणून धंदा करण्याचा विचार मनातून काढून टाकला अन धंदाही काही खास सुचत नव्हता. पैसे मिळतील असा. म्हणून मी जास्तच चिंतेत होतो. संपूर्ण उन्हाळा बसून राहून खाणे आता मला परवडण्यासारखे नव्हते. कारण घरात खाणार्यांची संख्याही वाढली होती. सर्वांना काय काम मिळेल याच्या मी शोधात होतो. पण माझा शोध असफल होत होता. माझे मुलही विचार करत होतेच. आमचे संपूर्ण घर धार्मिक होते. घरात रोज सकाळ संध्याकाळ हरिपाठ व आरती होते. कीर्तनाची आवडही सर्वांना होतीच. मी तालुक्यात जेथे कीर्तन असेल तेथे कुटुंबासह जायचो. मला धार्मिक गोष्टींचा जणू लळाच लागला होता.
       असेच एकदा मी कीर्तनाला जात होतो. तेव्हा आमच्या एका पाहुण्याने शेततळे  केले होते ते मी बघितले. त्या बद्दल संपूर्ण माहिती मी मिळवली व माझ्या मुलांशी देखील याबाबत चर्चा केली. कारण माझे शिक्षण कमी झाले होते. मी कुठलाही गोष्ट करताना मुलांचा व बायकोचा विचार घेत होतो. मला अशी माहिती भेटलीकी शेततळ्यासाठी सरकारी अनुदान उपलब्ध आहे. मग मी लगेच शेततळे  करण्याच्या मार्गावर लागलो. मी माझ्या शेतामध्ये सुमारे २० गुंठ्याचे शेतातले घेतले. त्याचे संपूर्ण काम मी उन्हाळ्यात पूर्ण केले होत. असेही उन्हाळ्यात आम्ही रिकामेच राहत होतो. आता शेततळ्या मध्ये फक्त कागद टाकण्याचे काम  मी बाकी ठेवले होते. यासाठी सुमारे मला दीड ते दोन लाख रुपये खर्च आला  होता. पावसाळा आता जवळ आला होता. पावसाची  आम्ही वाट पाहत होतो. पांडुरंगाच्या कृपेने  त्या वर्षी पाउस चांगला झाला होता. माझे शेततळे आता पूर्णपणे भरले जाणार होते. पावसाळ्यात आम्ही शेततळे पूर्णपणे भरून ठेवले होते. आमच्या भागात आम्ही जास्त करून कांद्याचेच उत्पन्न घेतो. अन ते पीक येतेही चांगले आमच्याकडे. अन पाणी पुरत नसल्याने बाकीचे पिकं आम्हाला म्हणावी तशी काढता येत नव्हती. तळ्यामुळे आम्हाला उन्हाळ्यात  पीक घेता येणार होते. पण कुठले पीक घ्यावे हेच मला काळात नव्हते.  माझी मुले द्राक्ष बाग लावण्याच्या विचारात होते. त्यांचा हा विचार चांगलाच होता.  त्यासाठी भरपूर खर्च येणार होता. याची त्यानाही कल्पना होतीच. त्यामुळे आम्ही पहिल्यावर्षी एखादे पीक कधिउन नंतर द्राक्ष बाग लावण्याचे ठरवले. मग उन्हाळ्यात कोणते पीक चांगले उत्पन्न देईल याचा शोध आम्ही घेऊ लागलो. माझा लहान मुलगा म्हनालकी आपण एक एकर टरबूज लागवड करू, कारण आपल्याला चांदवड बाजार जवळ आहे. जास्त लांब न जाता आपल्याला येथेच विक्री करता येईल. मलाही हे त्याचे म्हणणे पटले. 

आम्ही नर्सरी मधून टरबूजाची रोपे आणून लागवड केली. आम्हाला  चांदवड  शहर जवळच होते. काहीही लागले तरी आम्ही चांदवडला जात होतो. आम्ही टरबूजाची लागवड करतांना खाली मल्चिंग पेपर वापरला होता. त्याचा आम्हाला भरपूर फायदा झाला होता. माझी मुले व कुटुंबीय खूप मेहनत करत होते. शेततळे केल्यामुळे आमच्या घरातील सर्वांना काम मिळाले होते. आम्ही आमच्या मालाची विक्री चांदवड बाजारात करत होतो. त्यासाठी आम्ही टरबुजाची विक्री हात विक्रीने करत होतो. आम्ही व्यापार्याला देत नव्हतो कारण व्यापारी मालाला भाव कमी द्यायचे. याट व्यापाऱ्यांचा फायदा अधिक व्हायचा. पहिल्याच वर्षी तर्बुजाने आम्हाला एकरातून आठ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आम्हाला परत दुसर्या पिकाची आठवन देखील झाली नाही. एवढे भरगोस उत्पन्न मी पहिल्यांदाच घेतले होते. याचे सर्व श्रेय माझ्या मुलांना होते. मी व माझ्या मुलांनी द्राक्ष बाग लावण्याची पूर्ण कल्पना मनातून काढून टाकली होती. कारण की द्राक्ष बागला लागणारा खर्च, नैसर्गिक संकट यांचा विचार केला तर हे पीक कमी खर्चिक होते. यापुढेही मी हे पीक घेत राहणार आहे.     

No comments:

Post a Comment