मला ( किरण पाटील ) तशी भरपूर जमीन
आहे. पण मला शेती करण्याची आवड नव्हती. मी १२ वि पर्यंत मी तालुक्याच्या गावाला
शिकलो. माझा भाऊ देखील इंजिनिअरचे शिक्षण घेत होता. त्यालाहि शेती करायची नव्हतीच.
शेतीत खूप मेहनत करावी लागते व आपल्याकडे अनुभवही नाही असे तो नेहमी म्हणायचा. कारण
आमचे वडील डॉक्टर होते. त्यांनीही कधी शेती केली नव्हती. भाऊ जिल्ह्याच्या
ठिकाणी एका कंपनीत इंजिनिअर म्हणून नोकरीला लागला. तो तिकडेच राहू लागला. हळूहळू तो तिकडे सेटल
झाला होता. पगारही चांगला मिळत होता. वडिलांची अशी इच्छा होती कि मी शेती करावी.
पण मी कधी शेती केली नव्हती. माझे शिक्षणातही काही डोक चालत नव्हत. पर्याने मला शेती करणे भाग होते.
वडील आजारी पडले होते. त्यांना कॅन्सर झाला
होता हे फक्त मला आणि भावाला माहित होते. ते फक्त काही दिवसांचे सोबती आहे असे
स्पष्ट डॉक्टरांनी मला सांगितले होते. आम्ही वडिलांची अधिक काळजी घेऊ लागलो होतो.
ते सांगतील तसे करत होतो त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करत होतो. आम्ही आता अधिक
वेळ वडिलान बरोबर घालवत होतो. ऐके दिवशी वडिलांनी सर्व नातेवाईकांना बोलवायला
सांगितले. तसे आम्ही केलेही. वडिलांना सर्वांना भेटायचं होत. हि त्यांची शेवटची
इच्छा होती. त्यांनी मला भावाला जवळ बोलावून घेतले व सांगितले कि आयुष्यात कुणाचे
नाव घेऊ नका भांडणे करू नका, आईचा सांभाळ करा व मला सांगितले कि तू कुठेही जाऊ
नकोस येथेच गावात शेती कर. जमेल तशी कर. पण बाहेर पडू नकोस. एवढे सांगून वडिलांनी
अखेरचा श्वास घेतला होता. वडिलांचे हे बोलणे माझ्या डोल्यासामोर फिरत होते. मला
कोडे देखील पडले होते कि वडील का मला बाहेर पडू नको व येथेच राहून शेती कर असे मला
म्हणाले. मी अधिक विचार करू लागलो होतो. वडिलांचे सर्व विधी मार्ग झाले म्हणजे
दशक्रिया, तेरावे ई. तरी मी विचारच करत होतो वडिलांचे जाने म्हणजे आमच्यावर फार
मोठे संकट आल्या सारखे वाटत होते, पोरकं झालो आपण असे वाटत होते. पितृ छत्र हरपले
होते. पण आई खंबीर पाने आम्हाला आधार देत होती. दबक्या आवाजात. एकांतात जाऊन रडतही
होती. तिचा आधार म्हणजे आमच्यावर फार मोठी कृपा होती.
दिवसा मागून दिवस जात होते. भाऊ परत सेटल
झाला होता. त्याच्या कामावर तो निघून गेला होता. मला घरी राहणे भाग होते.आई आणि मी
दोघे घरी राहत होतो. घर खायला उठत आहे असाच वाटायचं. पण वडिलांचे स्वप्नहि मनात होतेच . चांगली शेती करून ते पूर्ण
कारार्यचे होते. पण मला उत्तम प्रकारे शेती येत नव्हती. औत-फाटा येत नव्हता. पुढे
पावसाला जवळ आला होता. शेतीची सर्व तयारी मी करत्त होतो.पावसाची वाट बघत होतो. बी-बियाणे घेऊन ठेवले होते. पाऊस
भरपूर झाला होता. मी मका, सोयाबीन ची पेरणी केली होती. तीही मजूर लावूनच. शेती
करण्याचे हे माझे पहिलेच वर्ष होते. माझ्या कडे भांडवल भरपूर असल्यामुळे मी बहुतेक
काम मजुरांकडून करून घेत होतो. त्यांच्या
कडूनच शेती करण्याची बरीचशी माहिती देखील घेत होतो. मला पहिल्या वर्षी नानुभव
नसल्याने म्हणावे तसे उत्पन्न झाले नाही असे ते मजूर म्हणत होते. माझ्या दृष्टीने
उत्पन्न चांगले झाले असे वाटत होते. असे वाटायचे कमी पैशांमध्ये आपल्याला एवढे
पैशे या पिकातून मिळाले आणखीन किती अपेक्षा ठेवायच्या. पण ते लोकच बरोबर बोलत होते
हे मला जेव्हा अनुभव आला तेव्हा समजले होते. असे माझे तीन वर्ष अनुभव घेता घेता
गेले. मला तीनही वर्ष कमीच उत्पन्न झाले होते. भांडवल जास्त खर्च होत होते. आई
माझ्यावर रागवत होती. ‘कसं होईल रे पोरा तुझ्या संसाराचं’ असे नेहमी म्हणत होती.

आईने मला शेती करता येत नव्हती म्हणून
माझ्या मावस भावाला निम्म्या वाट्याने शेती लाऊन देण्याचे ठरवले. तो आता त्याच्या
बायको मुलांसह आमच्या घरी राहू लागला.
त्याला शेती करण्याचे न्यान होते पण तो शिकलेला नव्हता. त्याला लिहिता वाचता येत
नव्हते. मला त्याने औत-फाटा शिकवायला सुरुवात केली होती. थोडं थोडं नांगरणी ,
वखरणी जमायला लागली होती. अशा पद्धतीने आमची शेती चालू होती. आम्ही शेतात कांदे, मका, सोयाबीन अशी ठोक
पिके घेत होतो व गहू,बाजरी व तृणधान्य पिके आमच्या गरजे पुरतेच घेत होतो. मावस भाऊ
आल्या मुळे आमचे उत्पन्न वाढले होते. पण त्याला निम्मे पैसे द्यावा लागत होते. हे
जरी मनाला पटत नव्हते तरी पण मी या पुढे काहीच करू शकत नव्हतो. कारण अजूनही मला
नित शेती येत नव्हती मी त्याच्या कडून शिकत होतो. मी फक्त शेताला पाणी देण्याचे काम करत होतो. पण एवढ नक्की कि मी भरपूर गोष्टी शिकत होतो.
१० वर्ष झाली होती मावस भाऊ आमची शेती करत
होता. त्यालाही भरपूर पैसे होत होते पण कष्ट हि तो भरपूर घेत होता.आता मी हळूहळू
शेतीत बदल करायचे ठरवले होते. त्यासाठी अनेक जनांना भेटत होतो अनेक प्रगतीशील
शेतकऱ्यांच्या शेतावर जात होतो. त्यांच्याकडून नवनवीन माहिती घेत होतो. काहीतारी
वेगळे करून उत्पन्न कसे वाढवता येईल हे मी बघत होतो. मी त्यासाठी अनेक पुस्तके देखील
वाचत होत्तो व नवीन काहीतरी करण्याच्या शोधात होतो. जास्त उत्पन्न देणारे पिक मला
हवे होते. आमच्या एका दूरच्या नातेवाईकाने त्याच्या शेतात ढोबळी मिरची लावली होती
त्यातून त्याला २० गुंठ्यात १० लाख रुपयाचे उत्पन्न झाले होते. मी त्यांच्या
शेताला भात देऊन आलो होतो. बरीच माहिती त्यांनी मला सांगितली. आगदी चोख पणे.

मी माझ्या शेतात ढोबळी मिरची लावण्याचे ठरवले. त्यासाठी मी एक एकर
क्षेत्रावर शेडनेट देखील केले तयारी जोरात केली होती. माहिती भरपूर होतीच. मी मे
महिन्याचा शेवटच्या आठवड्यात रोपांची लागण केली होती. मी बारकाईने काळजी घेत होतो.
कुठल्याही प्रकारची कमतरता या पिकला भासू नये याचीच काळजी मी घेत होतो. त्यासाठी
मी १ ट्रक शेणखत टाकले होते. सेंद्रिय
खतांवर माझा जास्त जोर होता. त्यामुळे पीकही जोमदार होते. जसजसे पिक वाढू लागले तसे मी त्यांची काळजी घेत
होतो. माझा प्रत्येक दिवस मी ढोबळी
मिरचीच्या शेतात घालवत होतो. बाकीचे पिके भाऊ सांभाळत होता. आता हळूहळू मला उत्पन्न चालू झाले होते. तसे
तसे माझी मेहनत वाढत चालली होती.
सुरुवातीला अनुभव नसल्यामुळे थोडे फार रोग
आले होते. परंतु ते औषधे मारून लगेच नियंत्रणात आले होते. फवारण्या मी जास्तीत
जास्त जैविक औषधांच्या घेत होतो. त्याचा रिझल्ट चांगला वाटत होता. मला दिवसा आड
उत्पन्न चालू झाले होते. माझी मिरची चार महिने भरपूर निघाली होती. चार
महिन्यातच मला ८ लाखाचे उत्पन्न झाले.
अजून माझी मिरची दोन महिने चालणार होती. मला अजून २ लाखाचे उत्पन्न अपेक्षित होते
ते होणार होते. या बाबत काहीच शंका नव्हती. माझ्या शेतावर माहिती घ्यायला व माझे
पिक बघायला अनेक शेतकरी येत होते. ज्या नातेवाईकांनी मला या बाबत माहिती दिली ते
देखील माझ्या शेतावर अनेक वेळा येऊन गेले होते.
त्यांच्या पेक्षा माझे पिक जोरदार झाले होते एवढे मात्र नक्की.

अशा प्रकारे मी नवनवीन प्रकारची माहित घेऊन
शेती करू लागलो होतो. मला यश देखील भेटत होते. कमी मेहनती मध्ये मी जास्त उत्पन्न
घेऊ लागलो होतो. माझा मावस भाऊ त्याच्या घरी निघून गेला होता कारण त्यालाही माझे
बघून असे करावे वाटत होते. आम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो थांबला
नाही. १२ वर्ष त्याने आमच्या घरी घालवली. त्यालाही प्रगती करावीशी वाटत होती. तो
त्याच्या मनाचा प्रश्न होता थांबायचे कि जायचे. पण तो थांबला नाही.
वडील गेल्या नंतर तब्बल १५ ते १६ वर्षांनी
मला चांगले उत्पन्न झाले होते. त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्या सारखे मला वाटत होते.
मी आता बराच नावलौकिक कमावला होता. प्रगतीशील शेतकऱ्यांच्या यादीत माझे नाव आले
होते. गावातील लोकही मला श्रीमंत शेतकरी समजत
होते. मी हळूहळू प्रगती पथावर जात होतो. मी आता ४० गुंठ्या पॉली हाऊस
घेण्याचा विचार केला आहे. त्यात मला जरबेरा फुलाचे पिक घ्यायचे आहे.त्यासाठीही मी
कृषीअधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली आहे.
माझे प्रयत्नच मला पुढे घेऊन जात आहेत व यापुढेही मी चांगल्याप्रयात्नातून पुढे जाणार एवढे मात्र
नक्की.
No comments:
Post a Comment